५ जूनच्या – जागतिक पर्यावरणदिना निमित्त एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडीया, पुणे आयोजित आणि नागरी समस्या निवारण समिती, भूगाव, सुरज फाउंडेशन, रोटरी क्लब – डी ३१३१, जायंटस ग्रुप ऑफ पुणे , आणि महा एनजीओ फेडरेशन यांचे संयुक्त सहकार्याने
चौंधे पाझर तलाव, भुगाव येथे सकाळी १० ते १२ या वेळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख उपस्थिती –
एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडीयाचे अध्यक्ष श्री आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे, संस्थापक डी. टी. देवळे, समन्वयक प्रसाद घळसासी, सुरज फाउंडेशनचे प्रविण लुंकड, रोटरीचे डॉ. सराफ, जायंट्स ग्रुप ऑफ पुणे चे अध्यक्ष प्रा.डॉ. कैलास बवले, सचिव प्रा. डॉ. धनंजय लोखंडे, भूगाव चे माजी सरपंच बाळासाहेब चौंधे, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.पोलीस पाटील श्री. नितीन चौधे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष कैलास चौधे, सरपंच सौ. सुनिताताई चौधे,विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष जितेंद्र इंगवले श्री. जयंत फडके, जयंत वाडेकर, महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक श्री मुकुंद शिंदे, प्रा. अनिल करंजकर, माऊली सातपुते, संजय चौधे, बाळासाहेब चौधे, पंढरीनाथ शेडगे, दीपक चौधे, जीवन कांबळे, गणेश चौधे, हनुमंत चौधे, समस्त चौधे पाटील परिवार आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी
पर्यावरण संरक्षण ही आपली सर्वांची गरज आणि जबाबदारी आहे. त्यामुळेच ग्रामस्थ, गावातील ग्रामपंचायत सरपंच इतर संस्था प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन निसर्ग रक्षण करण्यासाठी प्रयत्न शील राहायला हवे. त्याच्या प्रयत्नांना रोटरी, पर्यावरण स्नेही संस्था, जयंट्स वेलफेअर फाउंडेशन आशा सामाजिक सेवा संस्था नक्कीच मदत करतील अशी भूमिका मांडली.पर्यावरण संरक्षणाचा एकात्मिक भाव या उपक्रमातून पुढे आला. आज वृक्षारोपण केलेले वृक्ष हे पुढील तीन वर्षे जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे म्हणूनच या वृक्षारोपण अभियानास..माझा वृक्ष-माझी स्मृती अभियान स्वरूप प्राप्त झाले आहे.
वृक्षारोपण समारंभ नंतर वृक्ष प्रार्थनेने व आभार प्रदर्शनाने कार्यक्रम समाप्ती झाली.
सहभागी सर्व संस्था
मान्यवर आणि भूगाव ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ



